चला तर मग बघुया आपले वेद-उपनिषद काय सांगतात आपल्याला मित्रा विषयी,
अर्थात, खरा मित्र तोच की, जो पापातून आपल्याला सोडवतो आणि हितकारक कर्माला जोडतो. गुप्त गोष्टींना गुप्त ठेवतो आणि चांगल्या गुणांना प्रोत्साहन देतो. आणि जो सुख असो वा दुःख सोबत सोडत नाही. ही मित्राची लक्षणे आपल्या संतांनी, ऋषींनी सांगितली आहेत.
खऱ्या अर्थाने जर आपल्याला मित्राची व्याख्या समजायची असेल तर आपण अलौकिक-मित्र रामाचे जीवन समजायला हवे. आणि हे सौभाग्य आपल्याला या लॉक-डाउन च्या काळात दूरदर्शन वरील मालिकेव्दारे प्राप्त झाले आहे. आता फक्त गरज आहे ते आठवून जीवनात उतरवण्याची. चला तर मग आठवूया राम चरित्रातील काही प्रसंग.
रामाचे दोन खास मित्र होते एक गुह आणि दुसरा सुग्रीव. ज्यावेळी राम वनवास पुरा करून परत आला, त्यावेळी रामाने ताबडतोब हनुमाला सांगितले की, "गुहाला सांगून ये राम जिंकून आला आहे." तसेच गुहाचेही रामावर तितकेच प्रेम होते. भरत रामाला भेटायला वनात चालला होता त्यावेळी गुहाच्या मनात शंका आली आणि भरताला अडविण्यासाठी समोर सैन्य घेऊन लढायला उभा राहिला, कदाचित यात गुहाचा मृत्यु देखील झाला असता. पण रामाचे गुहावर इतके प्रेम होते, तसे गुहानेही त्याला तितकेच प्रेम दिले होते. म्हणून तर म्हणतात, प्रेम द्याल तर प्रेम मिळेल.
Love is not getting but giving, it is the result of pure living. |
सुग्रीवावर सुद्धा रामाचे किती प्रेम होते! सुग्रीवाला जरा देखील दुःख झाले, तर रामाच्या डोळ्यातून पाणी येई. आता हेच बघा, सुग्रीव ज्यावेळी रावणाच्या अंगावर धावून गेला, त्यावेळी त्याची रामाला किती काळजी वाटली होती! रामाने सुग्रीव आणि स्वतःत बिलकुल भेदभाव केला नाही. त्यामुळेच रामाने ज्यावेळी शरयूमध्ये प्रवेश केला त्या वेळी किष्किंधेहून सुग्रीव धावत धावत आला आणि त्यानेही शरयूमध्ये प्रवेश केला. खरोखर! ही आश्चर्याची गोष्ट आहे की, एका मित्राच्या मृत्यूनंतर दुसरा मित्र मृत्यूच्या मुखात उडी मारतो. रामाने केवढे अलौकिक प्रेम सुग्रीवाला दिले असेल!
I never have to live without you. |
खरोखर आपण भाग्यशाली आहोत. आपला जन्म या भारत भूमीवर झाला आहे, ज्या भूमीवर संत, ऋषी आणि देवानेही जन्म घेतला. म्हणून तर म्हणतात "दुर्लभम् भारतस्य जन्म:।" आशा प्रकारे आपण राम चरित्रातील अलौकिक मित्रता बघितली. पण जेंव्हा आपण मित्र हा विषय बघत आहोत त्या वेळी लोकोत्तर मित्र श्रीकृष्णाला विसरून कसे चालेल. आपण लहानपणी आई कडून सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीच्या गोष्टी ऐकल्याच आहेत. चला तर मग आठवूया त्या गोष्टी.
यद् ब्रूयात्तत्तथा कार्यमिति बुध्यस्व भारत।। |
राम आणि श्रीकृष्ण यांच्या ठाई असलेल्या मित्र प्रेमाची आजच्या मित्रते बरोबर आपण तुलना करूच शकत नाही. पण आपण करू शकतो या चरित्रांच्या जीवनाचा अभ्यास आणि प्रयत्न यांसारखी मित्रता स्वतःच्या जीवनात आणण्याचे. कारण बदल हा स्वत:पासूनच घडवायचा असतो.